( If you find these letters too small press ctrl + mouse scroll up for proper viewing ) कॉलेजच्या जल्लोष ने मी आणि माझ्या मित्रांचा उत्साह द्विगुण झाला होता.सकाळी कॉलेज मध्ये येताना आणि घरी परत जाताना देखील तो उत्साह मावळत नसे. अशी हि आठवड्यापासून चालेली दिनचर्या . फार उशिराची गाडी पकडण्यास आम्ही सर्व मित्रमंडळी ट्रेन चा दिशेने धाव गेऊ लागलो आणि आम्ही अखेरची जागा पकडली . हातात गिटार , कमरेला डिजिटल कॅमेरा असा एक कॉलेज कुमाराचा पोशाखात मी होतो. समोर बसलेली व्यक्ती मला भावून गेली..एक एकता लहान हसमुख पोर समोरचा चौथ्या सिट वर बसून आम्हा सर्वांकडे पाहत होता .. अंगावर साधे केशरी रंगाचे कपडे , निळी चड्डी आणि शर्टचा खिशात घडी घातलेला रुमाल.. माझा मित्र फोटो काढण्यास मग्न होऊ लागला..आमचा ग्रुप फोटो काढत असताना तो लहान पोर ह्याची मात्र खबर घेत की तो फोटो मध्ये येऊ नये आणि आमचा फोटो काढताना तो स्वतः बाजूला होत.. हे सर्व पाहून मी खूप भावूक झालो ..त्याचा एक फोटो काढायचा ठरवला आणि हाच तो फोटो ..इतक्या वेळ हा गप्प बसणारा आता त्याचा चेहऱ्य...