आई -एक कविता
प्रत्येक बाळासाठी आपली आई सर्व श्रेष्ठ | मी पण त्याच श्रेणीतला | बरं का?
आज "अरेच्चा किती मोठा झालास तू?" असे हजारो उद्गार ऐकून सुद्धा अजूनही एकदाच 'बाळ...' म्हणणारी आई ... किती गोड वाटते ते..
माझे उद्गार असेच एका कवितेत उतरवले.. आणि संयोग असा आहे कि आज 'मातृ दिन 'सुद्धा आहे..
आज "अरेच्चा किती मोठा झालास तू?" असे हजारो उद्गार ऐकून सुद्धा अजूनही एकदाच 'बाळ...' म्हणणारी आई ... किती गोड वाटते ते..
माझे उद्गार असेच एका कवितेत उतरवले.. आणि संयोग असा आहे कि आज 'मातृ दिन 'सुद्धा आहे..
पाप यांनी भरलेल्या धरती वरती,
तिची माया कोणालाच नाही,
तिलाच म्हणतो माझी आई |
पहिल्या झोपेतून डोळे उठले,
सरसावले ते तुला शोधण्यास,
तुला पाहताच मन सुटले,
झाले मन स्तब्द,
बंद केली डोळ्यांची पाकळी ,
सफेद चड्डी माझी भिजवून,
हात आवळून गेलो निजून.. |
पाहता पाहता झाला हे कार्ट मोठा,
रस्त्यावर चालताना अजूनही पकडते आई माझी बोटं,
राग येतो मग मला,
बोलतो ' मी झालो आहे न ग मोठा'
आई म्हणते मी तरी काय करू
एकुलता आहेस न पिल्ला |
झाला आहे बराच मोठा हा वेडा,
तरी लागते त्याला झोपायला आई चा कुशीत ,
खायला दोन पेडे का असो,
नेहमी वाटते आई समोरच बसो |
कधीच दुखी झालो नाही,
कधीच मी मावलो नाही,
कारण ते शक्य नाही,
जेव्हा आहे माझा सोबत आई |
सरसावत चालं आहे माझा आयुष ,
वाढतं चालं आहे माझा नशीब,
आईचे प्रेम आहे आदाट,
मग का विश्वास ठेवू देवावर्ती,
जेव्हा देवच आहे माझा पाशी?? |
खूपच मोठा झालो आहे मी,
आईचे प्रेम तरीही कमी नाही,
अजूनही 'आई' हाक मारली,
कि मन प्रसन्न होते ,
परत उत्तर आला नाही तर मन माझे घाबरते |
किती भाग्य आहे मला,
काय किती सांगू,
जगापासून अजून काय किती मागू?
आहे हे गाणं वाटते किती गावे,
डोकं ठेऊन तुझा मांडीवर
नेहमीसाठी .. निजून जावे..|
Comments
Post a Comment