बेवड्याची आत्मकविता
नमस्कार मित्रानो ! मी
एक बेवडा आहे . कोणत्या हि बेवड्याला पकडा मी तोच बेवढा आहे आणि हि आहे
माझी आत्मकथा. माझे बाबा माझ्या बालपणातच स्वर्गात गेले आणि मी मस्त २६ वर्षाचा
झालो असून नशेचा धुन्धीत आयुष्य मिरवत होतो.
पैश्यांच कुठे होतं टेन्शन ? आईच पेन्शन
होता ना ! आता फक्त “आई खाऊ खायला
पैसे दे” असा म्हणायचा
ऐवजी “चकना साठी पैसे
दे.” असे म्हणायला
लागत होते. नाही दिले तर तिच्यावर ओरडायचो
आणि पैसे नसले तर गाडीतले पेट्रोल विकून नशा करायचओ . पण करायचो नक्की, खूप छान
चालय माझ आयुष . पहा पुढे काय होता ते .
काय होते ते
जवानी चे अड्डे !,
दिन भर नशा
करूनही धुंद रहात जाई समाधानाचे खड्डे ,
कॉलेज संपुनी आज
४ वर्षी झाली
सर्व काही सुटले
पण नशा फक्त राहिली |
सांगून थकले सर्व
लोक,
दारू सोड! पी
फक्त कोक ,
बाबा परलोक जायचा
आधी कसली स्वप्ने पहिली होती,
आईला नको होते हिरे
द्यायचे तरी मोती |
मी सर्व ऐकी , पण
बाटली ला कुठे होते कान,
मित्राने
सांगितले होते मनाचे कर पहिले समाधान,
भोकात गेला
लोकांचा अपमान ,
नशेत होतो पुन्हा
मी,
गोड वाटली परत दारूची बाटली ती |
सर्व लोक
तिरस्कार करत ,
पण एकच मुलगी माझावर मरत ;
बापाने तिच्या हक्कले
मला ,
म्हणे कुठे करते
बेवड्याशी लग्न ,
ह्याचा पेक्षा
गाढव बरा .
आज तो दिवस आलाच
,
सर्व किती खुश
होते ,
तिरडी वर शांत
झोपुनी सफेद कपड्यात,
गुंतले होते माझे
गंजलेले शरीर ,
कोणाला नव्हती
माझी फिकीर !
सर्वांच्या सपाट
चेहऱ्यामागे दडले होते एक हास्य ;
कसा इतके दिवस
जगला हा बेवडा,
होते एक रहस्य |
तितक्यात आली
समोरून आई ,
तिला काही समजेच
नाही ;
आईचा आधी कधी
जातो का मुलगा ?
असाच प्रश्न तिला
सतवत राही .
रडू आले तिला
थोडे ,
माझा बालपणाचे दिन
आठवले केवढे ,
मग तिचा बांध
फुटला ,
माथ्यावरचे केस
सफेद होते तिचे अर्धे काही ,
रड रड बाळासारखी
रडली बिचारी माझी आई ,
मेघांकडे प्रवास
सुरु केला होता मी,
पण धरती वर
राहिली माझी दारूची बाटली ,
का माझे मन इतके झाले होते जड ?
मनात होता
पश्चातापाचा आणि आईच्या दुखाचा गड .
वाचकाला संबोधित :
तुम्ही
जर बेवडे आहात तर मला तुमचा कोणत्याही प्रकारचा अपमान करायचा नाही . तुम्ही कुशा:ल
जगत आहात . चालू दे ! ज्यांना काही तात्पर्य घ्यायचेत ते घ्यावे.
Comments
Post a Comment