९९' साल च्या आठवणी आणि श्रीखंडाच्या गोळ्या.

मी पहिल्या मजल्यावर राहतो बरं का ? ९९’ सालाच्या गोष्टी करतोय . माझीच नव्हे तर तुमचीही खात्रीने हीच गोष्ट असणार. घरातून  निघताना काहीतरी विसरणे नेहमीचेच असत. मग त्यामध्ये घड्याळ , रुमाल आणि टोपी इत्यादी. कोण एवढे परत चालत वर जाणार . मग ‘आई’ म्हणून बिल्डिंग खालून जोरात हाक मारायची . मग आई ते खिडकीतून फेकायची.

चक्क आई ला नावाने हाक न मारता फक्त आई म्हणून बोलवत असे तेही घसा फोडून. एवढ्या बिल्डिंग चिटकून चिटकून होत्या तरी माझ्या आवाजाची सिग्नेचर आई बरोबर टिपत असे आणि ती येऊन आपल्याला उत्तर देत असे. हि कथा शाळेत जाणाऱ्या चील्लारांपासून  ते ऑफिस चे धोंडे . सकाळ पासून ते संध्याकाळी लहान मुलं खेळेपर्यंत  असे आवाज ऐकू येत.

प्रेम युगाची हि काही वेगळीच रौनक होती. आपल्या प्रियकाराची अचानक ऐकू आलेली हाक आणि मग आईला हलचल मनाने विचारणे  “ समीर आलाय , मी पटकन खाली जाऊन येऊ का ?” आई काय म्हणेल याची उत्सुकता . आणि मग आई ‘हो’ म्हणाली कि बाल्कनीत आपले हसणं आवरून तो परत हाक देणारच तितक्यात  योगायोगानं आपले हसरं मुख दाखवणं आणि मग एकमेकांकडे बघून .....
( मी त्यावेळी खूप लहान होतो . माझावर शंका घेऊ नको . मी ह्यातले काहीच अनुभवले नाही . बरं का? मित्राने हे सर्व सांगितले )



ह्या गोष्टी कधी गेल्या कळला का? हाक कोणी देतच नाहीत. फोन वर सर्व आटपतात . त्या वेळी पण मोबाइल होते . पण ३ रु प्रति मिंट कोणाला परवडणार .
शिवाय आजकाल खालून हाक मारून ,

“ आदित्य , खाली येताना अजून एक bat आण !”
“ आई , श्रीखंडाच्या गोळ्या खायचा आहेत . १ रु टाक ना! ”
“ ममता , कशी आहेस? खाली येतेस ना ?”

हे आजकाल नाही ऐकू येत . मला कळतंय हे कमी महत्वाचे आहे. एवढा नाही फरक पडत.  तरी हे लेख वाचून तुम्ही ९९’ साली परत गेलात एवढे मात्र खरे आहे . काहीसा फरक नक्की जाणवतोय.


पुढच्या वेळी कोणाला तरी फोन करण्याऐवजी हाक मारून नक्की पहा. नेहमीच यंत्रण लोकांना जोडण्यास प्रभावी नसते. तुमचा त्या लहानपणीच्या  आणि तरुणीच्या दिवसात नक्की यात्रा करून याल.

इतर तुम्हाला नक्की आवडतील असे लेख :

Comments

Popular posts from this blog

To be or not to be

Are you a jerk photographer?

The funny thing about exam results..